आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा
आई भवानी तुझ्या कृपेने
तारसी भक्ताला
अगाध महिमा तुझी माऊली
वारी संकटाला
आई कृपा करी माझ्यावरी,
जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये..
गोंधळ मांडला
भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग
अंबे गोंधळाला ये
उधं उधं उधं उधं उधं
गळ्यात घालून कवड्याची माळ
पायात बांधिली चाळ
हातात परडी तुला ग आवडी
वाजवितो संबळ
धगधगत्या ज्वालेतून आली
तूच जगन्माता
भक्ती दाटून येते आई
नाव तुझे घेता
आई कृपा करी माझ्यावरी,
जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये
गोंधळ मांडला
भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग
अंबे गोंधळाला ये
उधं उधं उधं उधं उधं
अग सौख्यभरीला माणिक मोती
मंडप आकाशाचा
हात जोडुनि करुणा भाकितो
उद्धार कर नावाचा
अधर्म निर्दाळुनी धर्म हा
आई तूच रक्षिला
महिषासुर मर्दिनी पुन्हा हा
दैत्य इथे मातला
आज आम्हांवरी संकट भारी
धावत ये लौकरी
अंबे गोंधळाला ये
गोंधळ मांडला
भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग
अंबे गोंधळला ये
अंबाबाईचा
उधं उधं उधं उधं उधं
बोल भवानी मातेचा
उधं उधं उधं उधं उधं
काली काली अमावस की रात मैं काली निकली काल भैरव की लिरिक्स
मेरे हृदय का बाग खिला नाकोड़ा दरबार मिला लिरिक्स
- तुम्हे हर घड़ी माँ प्यार करेगी लिरिक्स – Lakhbir Singh Lakha
- हम तो दीवाने हो गए माँ भजन लिरिक्स
- Maa Main Khada Dware Pe Lyrics | माँ मैं खड़ा द्वारे पे
- फूल भी ना माँगती हार भी ना माँगती – mata rani bhajan
- शेराँ वाली माँ नू मनाइये लिरिक्स | Sherawali maa nu mnaiye