चांदण चांदण झाली रात एकविरीची पाहत होते वाट लिरिक्स

चांदण चांदण झाली

चांदण चांदण झाली रात एकविरीची पाहत होते वाट

चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट


पुण्याचा सोनार बोलवा ग
आईला नथनि घडावा ग
हळदी ग कुंकवाच घेऊन ताट
एकविरीची पाहत होते वाट
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट


ठाण्याचा कासार बोलवा ग
आईला बांगड्या भरा ग
लिंब ग नारळाच घेऊन ताट,
एकविरीची पाहत होते वाट
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट


रायगड चा लोहार बोलवा ग,
आईला त्रिशूल घडावा ग
उदो ग कोंबड्याच घेऊन ताट,
एकविरीची पाहत होते वाट
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट

सावन की रुत है आजा माँ हम झूता तुझे झुताएंगे लिरिक्स

साधु साध्वी चल रहे है विहार यात्रा में रोड पर

Leave a Comment